बातम्या
"एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा" कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन
By nisha patil - 9/8/2024 8:16:27 PM
Share This News:
जिल्ह्यात महसूल विभागातर्फे "महसूल पंधरवडा" साजरा करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा या उद्देशाने 2 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतंर्गत 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृह येथे सकाळी 11 वाजता "एक हात मदतीचा, दिव्यांच्या कल्याणाचा" हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी महसूल साधना कांबळे यांनी दिली.
दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगांना UDID कार्ड, अनाथ मुलांना प्रमाणपत्र, दिव्यांगांना व्हील चेअर, जयपूर फूट, एम.आर. कीट, इलेक्ट्रीक स्टीक, कानाचे मोल्ड व छत्रपती शिवाजी विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम साधना कांबळे व संजय गांधी योजनेच्या तहसिलदार वनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
"एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा" कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन
|