बातम्या

सांगलीत प्रेमप्रकरणातून एकाचा खून

One killed in Sangli due to love affair


By nisha patil - 8/29/2024 2:46:35 PM
Share This News:



सांगली जिल्ह्यातील जामवाडी परिसरात अनिकेत तुकाराम हिप्परकर वय 21या कबड्डीपटू तरुणाच्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.त्यातील चार जण अल्पवयीन आहेत.मुख्य संशितांच्या नात्यातील तरुणांशी प्रेम संबंध असल्याचा संशय व वाढदिवसादिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
       

मुख्य सूत्रधार मंगेश उर्फ अवधूत संजय आरते  वय २७आणि जय राजू कलाल वय१८ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.या दोघांना सात दिवसाची कोठडी सुनावली आहे.
   

  मृत अनिकेत व मुख्य सूत्रधार मंगेश दोघेही जामवाडीतील मर्गुबाई मंदिराजवळील गल्लीतले त्यांच्यात वर्षभरापासून वात धुसमत होता .मंगेशच्या नात्यातील तरुणीशी अनिकेतचे प्रेम संबंध असल्याचा संशय होता.तसेच 23 ऑक्टोंबरतसेच 23 ऑक्टोंबर 2023 रोजी मंगेशच्या वाढदिवसा दिवशी अनिकेतशी वाद झाला.पण तो वाद मिटविला.पोलीस ठाण्यापर्यंत मारामारीचे प्रकरण आले नव्हते.महिलेची छेडछाड व्याजाच्या पैशांवरून ही संशयित्व अनिकेत मध्ये वाद होता.त्यामुळे मंगेशने अनिकेतचा काटा काढण्याचा कट रचला होता.
     

पाच संशयतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मंगेश आरती यांच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली.


सांगलीत प्रेमप्रकरणातून एकाचा खून