बातम्या

अवघे गर्जे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।

Only Garje Pandharpur Called Namas alarm


By nisha patil - 7/17/2024 2:57:19 PM
Share This News:



आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरी वैष्णवांचा मेळा भरला आहे. पंढरीत सुमारे वीस लाखाहून अधिक भाविक दाखल झाले झाले आहेत. संतांच्या पालख्या मंगळवारी सायंकाळी तीर्थक्षेत्र पंढरपुरात दाखल झाल्या आहेत . विठ्ठल भेटीला आलेल्या माऊलींनी संपूर्ण पंढरपूर परिसर फुलून गेला आहे . या भागात व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. राज्यासह परराज्यातून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला आहे. 
 

      संरक्षणाच्या दृष्टीने पंढरपूरसह आसपासच्या भागामध्ये मिळून सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी , कर्मचारी तैनात करण्यात आली आहेत . तीनशेहून अधिक सी सी टीव्ही  कॅमेऱ्यांची नजर पंढरपूरवर  आहे. नगर प्रशासन ,तालुका प्रशासन  यांच्या वतीने आरोग्य विषयक सेवा बजावण्यात येत आहेत.  राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. 
       

चंद्रभागाबाई स्नान करूनि श्रीमान विठ्ठलभाई रुक्मिणीची द र्शन घडण्यासाठी नामदेव पायरी कडेे येणाऱ्यांची भावीकांमध्ये विठे माऊलींच्या नामाचा उत्साह दिसूना येत असूंन हात  उंचावून जय घोष केला  जात आहे  त्यामुळें वारकर्यामध्ये  उत्साह नवचैतन्याची संचारत  आहे


अवघे गर्जे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।