विशेष बातम्या

पन्हाळा गडावर "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे आयोजन – आमदार विनय कोरे यांची उपस्थिती

Organization of Jai Shivaji Jai Bharat


By nisha patil - 2/22/2025 12:46:19 PM
Share This News:



छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने पन्हाळा गडावर "जय शिवाजी जय भारत" राज्यव्यापी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

शिवरायांच्या शौर्याला उजाळा देऊन देशभक्ती, नेतृत्व व सुशासन जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


पन्हाळा गडावर "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे आयोजन – आमदार विनय कोरे यांची उपस्थिती
Total Views: 32