बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन
By nisha patil - 7/10/2024 10:27:19 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमानाने २ ते ८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वन्यजीव संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांना पर्यावरणाची माहिती देणे होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि विज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रो. डॉ. ए. एस. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये रांगोळी, भाषण, निबंध, पोस्टर, वन्यजीव फोटो स्पर्धा, हस्तकला प्रतिकृती, लघुपट, हाताने रंगविण्याच्या स्पर्धा, आणि प्रश्नमंजुषा इ. स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये एकूण 130 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रा. वृषाली मिसाळ (रांगोळी), डॉ. कोमल भिसे (भाषण), डॉ. ई. बी. आळवेकर (निबंध), श्री. एस. जी. कुलकर्णी (पोस्टर), श्री. ऋषिकेश गोनी (फोटो व लघुपट), श्री. सतीश उपळावीकर (हस्तकला प्रतिकृती) आणि डॉ. आर. वाय. पाटील (चेहरा व हात रंगविणे) यांनी काम केले.
याशिवाय, "वन्यजीव संरक्षणाचे महत्व आणि गरज" या विषयावर प्रा. पूनम पाटील यांनी व्याख्यान दिले, ज्यामध्ये त्यांनी वन्यजीवांचे पर्यावरणातील स्थान आणि संरक्षणाच्या उपाययोजनांची महत्त्वता स्पष्ट केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, IQAC समन्वयिका डॉ. श्रुती जोशी आणि प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक, रजिस्टार श्री. आर.बी.जोग व कर्मचारी यांनी योगदान दिले. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देण्यात आली, त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये एकता व सहकार्याची भावना वाढवण्यासाठी तसेच निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी प्रेरणादायक ठरला
विवेकानंद महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन
|