बातम्या

समरजीत सिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Organized various activities


By nisha patil - 1/18/2025 3:10:18 PM
Share This News:



समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका आणि मुरगूड येथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (ता. १८) अंगणवाडी, शाळा, रुग्णालये आणि वृद्धाश्रम येथे खाऊ, भोजन, आणि शालेय साहित्य वाटप होणार आहे. सवलतीच्या दरात पासपोर्ट कॅम्पही आयोजित केला जाईल.

रविवारी (ता. १९) श्रीराम मंदिर सभागृहात महाआरती, चित्रकला स्पर्धा, डोळे तपासणी, रक्तदान शिबिर आणि घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २०) कागल आणि मुरगूड येथे पीएम विश्वकर्मा ई-श्रम आणि आभा कार्डसाठी मोफत नोंदणी कॅम्प, खुल्या करा ओके गीत गायन स्पर्धा, मिनी साउंड स्पर्धा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.

राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन आणि विविध संघटनांच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


समरजीत सिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
Total Views: 30