बातम्या
शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त व्याख्यान, पोवाडा आणि मर्दानी खेळांचे आयोजन
By nisha patil - 2/17/2025 10:01:34 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त व्याख्यान, पोवाडा आणि मर्दानी खेळांचे आयोजन
कोल्हापूर | प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठात ‘शिवजन्मोत्सव सोहळा 2025’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (दि. 18 फेब्रुवारी) दुपारी 12.30 वाजता ‘कणखर नेतृत्वासाठी शिवनीती’ या विषयावर शिवचरित्र अभ्यासक राहुल नलावडे (रायबा) यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 5 वाजता युवाशाहिर डॉ. अमोल रणदिवे यांच्या शाहिरी पोवाड्याचे सादरीकरण आणि मर्दानी खेळांचे प्रदर्शन होईल.
बुधवारी (दि. 19 फेब्रुवारी) सकाळी 7.30 वाजता शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना व मर्दानी खेळ, तर सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त व्याख्यान, पोवाडा आणि मर्दानी खेळांचे आयोजन
|