बातम्या
स्वामित्व योजनेमुळे मिळकतीचे आपापसातील वाद संपुष्टात येतील – खासदार धनंजय महाडिक
By nisha patil - 1/18/2025 4:12:09 PM
Share This News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत देशभरातील ६५ लाख मिळकत पत्रिकांचे आभासी वितरण करण्यात आले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात याचा प्रक्षेपण करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ५० लाभार्थ्यांना प्रॉप्रर्टी कार्ड वितरित केले. महाडिक यांनी यावेळी स्वामित्व योजनेचे महत्त्व सांगितले आणि यामुळे नागरिकांच्या मिळकतीवरील वाद कमी होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ९२ हजार २४ प्रॉप्रर्टी कार्ड तयार झाले असून कोल्हापूर राज्यात अग्रगण्य ठरला आहे.
स्वामित्व योजनेमुळे मिळकतीचे आपापसातील वाद संपुष्टात येतील – खासदार धनंजय महाडिक
|