बातम्या

पी एन पाटील एक आधारस्तंभ : सतेज पाटील

PN Patil A Pillar  Satej Patil


By nisha patil - 6/1/2025 12:19:23 PM
Share This News:



पी एन पाटील एक आधारस्तंभ : सतेज पाटील

पी. एन. पाटील यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त  आधारस्तंभ नेत्याच्या आठवणींना उजाळा


 दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी काँग्रेस मधील पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वगुणांचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पी एन पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

माजी आमदार बंटी पाटील यांनी सभेत बोलताना पी. एन. पाटील यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "पी. एन. पाटील हे एक आधारस्तंभ होते, ज्यांनी आपल्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासकामे करण्यात आली. आज त्यांची जयंती साजरी करताना आम्ही त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्याचा निर्धार या सभेत व्यक्त केला"

सभेत उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनीही पी. एन. पाटील यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या एकनिष्ठतेचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. "पी. एन. पाटील यांनी काँग्रेसमधील एकनिष्ठतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. यावेळी खासदार शाहू महाराज, राहुल पाटील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पी एन पाटील एक आधारस्तंभ : सतेज पाटील
Total Views: 36