ताज्या बातम्या

पन्हाळा गडावर भारतातील पहिले १३D थिएटर – ‘पन्हाळयाचा रणसंग्राम’ लवकरच प्रेक्षकांसाठी खुला

Panhala 13D theater


By nisha patil - 7/3/2025 6:23:05 PM
Share This News:



पन्हाळा प्रतिनिधी: शहाबाज मुजावर 

ऐतिहासिक पन्हाळा गडावर पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने "Proposal for SITC & implementation of mapping Stereoscopic 13D simulation Technology with L & S at Panhala" या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील पहिल्या अत्याधुनिक १३D तंत्रज्ञानाच्या थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. या ऐतिहासिक थिएटरचे आणि "पन्हाळयाचा रणसंग्राम" या लघुपटाचे दि. ६ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

इतिहासाचा थरार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानात

१६७३ च्या मार्च महिन्यात कोंडाजी फर्जंद आणि अवघ्या ६० मावळ्यांनी प्रचंड शौर्य गाजवत पन्हाळा गड जिंकून स्वराज्यात सामील केला. हा थरार ‘पन्हाळयाचा रणसंग्राम’ या १३D तंत्रज्ञानाच्या लघुपटाच्या माध्यमातून लोकांसमोर साकारण्यात आला आहे. हा लघुपट पाहताना प्रेक्षकांना रणभूमीवरील प्रत्यक्ष युद्धाचा रोमांचक अनुभव मिळणार आहे.

लवकरच प्रेक्षकांसाठी खुला!

सदर थिएटरमधील लघुपट सर्व तांत्रिक पूर्तता करून पुढील ८ ते १० दिवसांत प्रेक्षकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे लवकरच माहिती जाहीर करण्यात येईल.

हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींनी पन्हाळा गडाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी केले आहे.


 


 


पन्हाळा गडावर भारतातील पहिले १३D थिएटर – ‘पन्हाळयाचा रणसंग्राम’ लवकरच प्रेक्षकांसाठी खुला
Total Views: 929