बातम्या
पन्हाळा नगरपरिषदे कडून सर्व व्यावसायिकांना नोटीस लागू..
By nisha patil - 9/9/2024 10:59:12 PM
Share This News:
*पन्हाळा नगरपरिषदे कडून सर्व व्यावसायिकांना नोटीस लागू..*
*व्यवसायिकांचे प्रांत अधिकाऱ्यांना यांना निवेदन.*
*पन्हाळगडावरील व्यवसायिकांवर युनेस्को नामांकनामुळे संकट...*
*प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर*
पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी करण्यात येत असून, युनेस्कोची टीम ऑक्टोबर महिन्यात किल्ल्याची पाहणी करणार आहे. या संदर्भात पन्हाळा नगरपरिषदेने पन्हाळगडावर व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना ६ सप्टेंबर २०२४ रोजी नोटिसा बजावल्या आहेत, ज्यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
मराठा लष्करी स्थापत्य शृंखलेतील पन्हाळा किल्ला हा नामांकित स्मारक होण्यासाठी युनेस्कोच्या निरीक्षकांचे पन्हाळावर येण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपरिषदेकडून किल्ल्यावरील व्यवसायांवर निर्बंध घालण्याचे आणि काही व्यवसायांना हटवण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २०० ते २५० कुटुंबांचे उदरनिर्वाह धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पन्हाळगडावर गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी आपली मागणी मांडली आहे की, त्यांच्या पारंपारिक व्यवसायांना हटवू नये. त्यांनी यापुढे नियमांचे पालन करण्याची तयारी दाखवली असून, जुन्या व्यवसायिकांना त्या ठिकाणीच व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. तसेच, जे काही नियम आणि अटी लागू होतील, त्यांचे पालन करूनच व्यवसाय सुरू ठेवले जावेत, असे व्यावसायिकांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना माजी नगराध्यक्ष विजय पाटील माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, नगरसेवक रवींद्र तोरसे रवींद्र धडेल असिफ मोकाशी राजू नगारजी संग्राम भोसले सुभाष गवळी जितेंद्र पवार साहिल पवार राहुल भोसले आणि शहानवाज मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
पन्हाळा नगरपरिषदे कडून सर्व व्यावसायिकांना नोटीस लागू..
|