बातम्या

पन्हाळा पर्यटन महोत्सवास सुरुवात; ऐतिहासिक अस्त्र-शस्त्र प्रदर्शन खुलं

Panhala tourism festival begins


By nisha patil - 5/3/2025 3:35:51 PM
Share This News:



पन्हाळा पर्यटन महोत्सवास सुरुवात; ऐतिहासिक अस्त्र-शस्त्र प्रदर्शन खुलं

६ मार्चला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १३ डी थिएटरचा शुभारंभ

पन्हाळा (प्रतिनिधी : शहाबाज मुजावर) – पन्हाळा किल्ल्यावर पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली असून, इंटरप्रीटेशन सेंटर येथे ऐतिहासिक अस्त्र-शस्त्र, नाणी व कागदपत्रांचे प्रदर्शन खुले झाले आहे. उद्घाटन आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन ७ मार्चपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे.

दरम्यान, ६ मार्च रोजी पन्हाळा विजय दिनानिमित्त गडावर १३ डी थिएटर लघुपटाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गडावरील वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पन्हाळा पर्यटन महोत्सवास सुरुवात; ऐतिहासिक अस्त्र-शस्त्र प्रदर्शन खुलं
Total Views: 71