बातम्या

कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनानिमित्त पांजरपोळ संस्थेतील गो सेवकांचा सत्कार

Panjarpol kolhapur


By nisha patil - 8/16/2024 11:07:31 PM
Share This News:



कोल्हापूर, 15 ऑगस्ट: भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पांजरपोळ संस्थेतील गो सेवा करणाऱ्या डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभात अॅड कीर्ती कुमार शेंडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पांजरपोळ संस्थेतील गो सेवा करणाऱ्या डॉ. राजेंद्र बागल व सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार रेशन धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी डॉ. मोरे यांनी पशुधनाचे रक्षण व जतन हे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास शिवशंभो फाउंडेशनचे अध्यक्ष सुचित हिरेमठ, अमेय ढवळे, अरविंद वर्धमाने, बाळासाहेब मन्ना डे, संजय बागल, राजू रेवणकर, विशाल पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनानिमित्त पांजरपोळ संस्थेतील गो सेवकांचा सत्कार