बातम्या

पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

Pankaj munde  Prakash abitkar


By nisha patil - 7/30/2024 6:10:30 PM
Share This News:



वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी घेतली भेट.  प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे.   त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं.पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण झाली.

              

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकवेळा उपोषण केलं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा मनोज जरांगे यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
             

प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर लातूरमध्ये होते. आज ते लातूरवरुन बीडकडे निघाले होते. त्याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली. मात्र ही राजकीय वर्तुळातील महत्त्वाची भेट आहे.


पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट