बातम्या
शाळांच्या शुल्कवाढीमुळे पालकांमध्ये अस्वस्थता; ५० ते ८० टक्के वाढ – लोकल सर्कलचा सर्व्हे
By nisha patil - 7/4/2025 3:38:17 PM
Share This News:
शाळांच्या शुल्कवाढीमुळे पालकांमध्ये अस्वस्थता; ५० ते ८० टक्के वाढ – लोकल सर्कलचा सर्व्हे
दिवसेंदिवस शाळांच्या शुल्कामध्ये होत असलेली वाढ पालकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. प्राथमिक शिक्षण महाग होत चालले असून, गेल्या तीन वर्षांत देशभरातील अनेक शाळांनी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ केल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
लोकल सर्कल या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने घेतलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. देशातील ३०९ जिल्ह्यांतील ३१,००० पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. यामध्ये ४४ टक्के पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलांच्या शाळांनी मागील तीन वर्षांत ५० ते ८० टक्क्यांनी शुल्क वाढवले आहे.
यातील ८ टक्के पालकांनी ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे नमूद केले. ३६ टक्के पालकांनी ५० ते ८० टक्के वाढ तर ८ टक्क्यांनी ३० ते ५० टक्के शुल्कवाढ अनुभवली आहे. फक्त ७ टक्के पालकांच्या मते शाळांच्या शुल्कवाढीवर राज्य सरकारने काही मर्यादा घातल्या आहेत.
शाळा सुरू होण्याच्या काळात पालकांवर आर्थिक दडपण वाढते. खासगी शाळांमध्ये सर्वच वर्गांचे शुल्क दरवर्षी वाढवले जात असल्याने ही चिंता अधिक गडद होते.
या सर्वेक्षणात तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये शुल्कवाढीवर लक्ष ठेवत असल्याचेही पालकांनी नमूद केले.
लोकल सर्कलचे सचिन तपारिया यांनी सांगितले की, मार्च ते एप्रिल दरम्यान देशभरातून शेकडो तक्रारी आल्यानंतर हा सर्व्हे करण्यात आला असून, या विषयावर सरकारी यंत्रणांनी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे
शाळांच्या शुल्कवाढीमुळे पालकांमध्ये अस्वस्थता; ५० ते ८० टक्के वाढ – लोकल सर्कलचा सर्व्हे
|