बातम्या

पासार्डे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.इंदुबाई सुतार

Pasarde endubai sutar


By nisha patil - 7/8/2024 3:45:25 PM
Share This News:



बहिरेश्वर प्रतिनिधी...मौजे पासार्डे ता करवीर च्या उपसरपंच पदी पासार्डे पैकी  पाचाकटेवाडी तालुका करवीर येथील सौ इंदुबाई सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली..

        
वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये शंभू महादेव भेंडाई ग्राम विकास आघाडीच्या पाच सदस्यासह  लोकनियुक्त सरपंचपदी विष्णू पाटील निवडून आले होते... पाच सदस्यांना पाच वर्षे उपसरपंच पद वाटून देण्यात आले होते, रोटेशन नुसार उपसरपंच महेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे हे पद रिक्त होते.

लोकनियुक्त सरपंच विष्णू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली... यावेळी इंदुबाई बाळू सुतार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे ग्रामसेवक दिलीप गोसावी यांनी घोषित केले..तद्नंतर सुतार समर्थकांनी गूलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली. या निवडी वेळी ग्रामपंचायत सदस्य रंगराव सुतार,  शरद पाचाकटे, सविता कांबळे,  महेश पाटील उपस्थित होते. तंटामुक्तीचे अध्यक्ष संभाजी 
चाबुक, माजी सरपंच लकुळा पाटील,  के के चौगले , माजी सरपंच मधुकर कांबळे, पांडूरंग पाचाकटे,  के एस चौगले,  बदाम पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


पासार्डे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.इंदुबाई सुतार