बातम्या
रुग्णांना मिळणार आता मोफत सेवा.. मंगेश चिवटे
By nisha patil - 2/15/2025 2:57:02 PM
Share This News:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष’ सुरू करण्यात आला. हा कक्ष महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यासह विविध योजनांचा समन्वय साधून गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देईल.
राज्यात ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ साजरे करण्यात येणार असून, मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जातील. 6000 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव, तसेच हृदय विकारग्रस्त बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची सोय केली जाणार आहे.
रुग्णांना मिळणार आता मोफत सेवा.. मंगेश चिवटे
|