बातम्या
उचगावातील दिव्यांगाची पेन्शन बंद : शासनाच्या नावे आक्रोश
By nisha patil - 1/14/2025 6:26:30 PM
Share This News:
उचगावातील दिव्यांगाची पेन्शन बंद : शासनाच्या नावे आक्रोश
जीवंत दिव्यांग व्यक्तीला प्रशासनाने मयत दाखवून त्यांची पेन्शन बंद करण्यात आलीय. संघटनेच्या माध्यमातून न्याय मागणाऱ्या दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम उर्फ मारुती सदाशिव चौगुले यांच्याच नावाची पेन्शन बंद झाल्याने त्यांनी शासनाच्या नावाने आक्रोश व्यक्त केलाय.
एप्रिल 24 पासून संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारी पेन्शन मिळालेली नाही. दोन्ही हाताने दिव्यांग असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. बँक खात्यावर अजून का पेन्शन जमा झाली नाही. याची चौकशी करण्यासाठी करवीर तहसील कार्यालय येथे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करणारे अधिकाऱ्याकडून उत्तम चौगुले यांना पेन्शन कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केलाय. उत्तम चौगुले म्हणाले की, शासनाने मी जिवंत असताना मृत असलेले सिद्ध केले एप्रिल 23 पासून पेन्शन बंद आहे मयत झाल्याचा दाखला कोणीतरी मुद्दाम सादर केला आहे ज्यांनी दाखला दिला आहे त्याची चौकशी करण्यात यावी तसेच माझ्या हक्कावर गदा न आणता शासनाने त्वरित अनुदान द्यावे असे हे यावेळी म्हणाले.
उचगावातील दिव्यांगाची पेन्शन बंद : शासनाच्या नावे आक्रोश
|