विशेष बातम्या
काळम्मावाडी योजनेच्या पाईपलाईनचे काम
By nisha patil - 8/3/2025 10:36:11 PM
Share This News:
काळम्मावाडी योजनेच्या पाईपलाईनचे काम
निम्म्या शहरातील पाणी पुरवठा सोमवारी व मंगळवारी बंद
काळम्मावाडी योजनेची देखभाल दुरूस्ती व अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनची कामे सोमवार व मंगळवार, दि.10 व 11 मार्च 2025 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर व सलग्नित उपनगरे आणि ग्रामिण भागातील नागरिकांना सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच बुधवार, दि.12 मार्च 2025 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तसेच बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्डमधील नागरीकांचा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.अशी माहिती महापालिकेतील देण्यात आली आहे.
काळम्मावाडी योजनेच्या पाईपलाईनचे काम
|