ग्रामीण
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये -निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली
By nisha patil - 1/21/2025 5:39:24 PM
Share This News:
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली
कोल्हापूर, 21 जानेवारी: निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आणि त्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज योग्य पद्धतीने नष्ट करणे आवश्यक आहे. विशेषतः प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतो, त्यामुळे त्याचा वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अंतर्गत कारवाई होईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये -निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली
|