बातम्या
पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेशावर पन्हाळावासीयांचा विरोध
By nisha patil - 9/3/2025 5:56:09 PM
Share This News:
पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेशावर पन्हाळावासीयांचा विरोध
पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर, 6 मार्च 2025 रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , तसेच स्थानिक ,शाहुवाडी पन्हाळा आमदार, विजयरावजी कोरे ,यांनी पन्हाळा पर्यटक महोत्सव जाहीर भाषणामध्ये सांगितले की, पन्हाळा वर्ल्ड हेरिटेज मध्ये येत्या मे महिन्यात पॅरिसमध्ये अंतिम मीटिंग आहे. जवळजवळ सर्व निश्चित झाले आहे.तसेच जो छत्रपती शिवरायांच्या काळातला पन्हाळगड होता.तशाच पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे . कोरे यांनी सर्व कागदपत्रे नकाशे काढली आहेत.असे त्यांनी जाहीर केले.कि वर्ल्ड हेरिटेज मध्ये पन्हाळा जाणार गडावरच्या लोकांनी त्याची घेतली धास्ती .चार दिवसापूर्वीच मा. मुख्यमंत्र्यांसह स्थानिक जाहीर केलेल्या पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश करायला त्रीव विरोध. आज पन्हाळवासीयानी केला

मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक होत आहे.'युनेस्को' ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पन्हाळा किल्ल्याचा समावेश आहे. पन्हाळा हा एकमेव असा किल्ला आहे की, गडावर वस्ती आहे.

याबाबत ५ ऑक्टोबर दरम्यान सदस्य वहाजोंग ली (दक्षिण कोरिया) 'युनेस्को'ची समिती पन्हाळगडावर भेट देवुन गेली आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहेत.
वर्ल्ड हेरिटेज चे अटी नियम शर्ती अजून गाववाल्यांना कळाले नाहीत. त्यात सुरुवातीचा असणारा जुना नाका .तो जमीनदोस्त केला.तसेच आता सध्या पन्हाळगडावरच्या आकाशवाणीचे टावर काढण्यात येणार आहे.त्या आकाशवाणी टावर उभा करण्यासाठी, त्यांना जोतिबा या ठिकाणी दहा गुंठे जागा देण्यात आले आहे. तसेच खाजगी मोबाईल टावर यांना नोटीसा दिले आहेत. तसेच लोकांच्या जीवन आवश्यक असणारे गडावरची पाण्याची टाकी सुद्धा काढण्यात येणार आहे.

पन्हाळगडावर 1052 पासून वस्ती आहे. असा गडाचा इतिहास आपल्याला पहावयास मिळतो. छत्रपतीं शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या काळातही वस्ती होती. आत्तासुद्धा वस्ती आहे.1954 ला खास गिरीशस्थान नगरपरिषद स्थापन झाले आहे. जर पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाला संपूर्ण किल्ल्याला तर किल्ल्यावर वस्ती राहू शकत नाही. अमनुष्य किल्ला होईल. नवीन बांधकाम करता येणार नाही. जुने बांधकाम रिपेरी करता येणार नाही. कसल्याही प्रकारचे खाद्यपदार्थाची छोटी-मोठी दुकाने, स्टॉल, हॉटेल्स लावता येणार नाही. तसेच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय हि अन्य ठिकाणी स्थलांतर होणार. अशा काही माहितीगारनी माहिती या गाव सभेवेळी दिली,

या सभेवेळी खालील प्रस्ताव मांडण्यात आले. कृती समिती नेमणे ,जुने कागदपत्रे वस्ती असलेली मिळवणे, वर्ल्ड हेरिटेज संदर्भात सर्व कागदपत्र मिळवणे, विविध प्रकारे आंदोलन उभी करणे, गावातील लोकांना जागृत करणे, उच्च न्यायालयात रेट पिटीशन दाखल करणे, जेसलमेल, हम्पी, बदामी , या ठिकाणी भेट देऊन तिथे परिस्थिती पाहणे, इतिहास अभ्यासकरांना भेटणे ,तसेच स्थानिक आमदार खासदारांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणे, पन्हाळगडच्या युनोस्को पासून वाचवा पहिल्या गाव सभेच्या मीटिंगमध्ये ठरले आहे.

तसेच युनेस्को मुर्दाबाद , युनोस्को आम्हाला मान्य नाही. आम्ही युनेस्को जाणार नाही. गड आहे आमच्या हक्काचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय . संभाजी महाराज की जय. अशा घोषणा नी पन्हाळा बस स्थानक दुमदुमून गेला होता.
तसेच पन्हाळातील मुंबई उच्च न्यायालयाचे वकील मा. द्रुपद पाटील यांनी सांगितले की,यासाठी कोर्टात याचिका दाखल करावे लागेल. तसेच अशाच पद्धतीने जर फक्त गडावरचे ऐतिहासिक ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज मध्ये घेतले.तर आपल्याला धोका नाही.परंतु जर संपूर्ण पन्हाळगड हेरिटेजमध्ये घेतल्यास तिथे लोक वस्ती राहू शकत नाही. संतगतीने ती वस्ती खाली केली जाईल. अशाच प्रकारे पुणे शनिवार वाडा या ठिकाणी आजूबाजूच्या वस्तीसाठी लागू झाले आहे.कारण गडावर शंभर मीटर मध्ये अनेक विना परवाने बांधकाम झाली आहेत. न्यायालयामध्ये आपण नंतर गेल्यानंतर कोर्ट आपल्याकडे घर बांधण्याचा सर्व विभागाचा परवानगी कंप्लेशन सर्टिफिकेट मागेल ते आपल्याकडे नाही आहे.त्यामुळे बेकायदेशीर पणे बांधकाम झाले आहे.त्यामुळे ते आपल्याला काढूनच घ्यावे लागेल. त्यासाठी आपण पन्हाळा वासियांनी युनोस्को च्या विरोधात याचिका दाखल करणेआवश्यक आहे. असे त्यांनी पन्हाळा गाव सभेवेळी मार्गदर्शन केले,
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, आसिफ मोकाशी ,माजी उपनगराध्यक्ष ,चेतन भोसले ,सुनील हावळ, जमीर गारर्दी, रवींद्र तोरसे , माजी नगरसेवक, जीवन पाटील, सतीश भोसले ,अख्तर मुल्ला, रामानंद पर्वतगिरीगोसावी, सुनील काशीद ,जितेंद्र पवार, रमेश स्वामी, विनोद गायकवाड, राजू सोरटे, मंदार नायकवडी, आयाज आगा, अमित दळवी, मुबारक मुजावर, धनंजय बच्चे ,प्रकाश गवंडी, दिलीप दळवी, स्थानिक गडावरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.,,
पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेशावर पन्हाळावासीयांचा विरोध
|