बातम्या
शिवनाकवाडीत महाप्रसादातून विषबाधा – ३०० हून अधिक नागरिक रुग्णालयात
By nisha patil - 5/2/2025 5:37:55 PM
Share This News:
शिवनाकवाडीत महाप्रसादातून विषबाधा – ३०० हून अधिक नागरिक रुग्णालयात
इचलकरंजीत रुग्णालयांमध्ये उपचार सुरू, प्रशासन सतर्क
इचलकरंजी : शिवनाकवाडी गावातील यात्रेदरम्यान महाप्रसाद घेतल्यानंतर ३०० ते ३५० नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेकांना उलटी, जुलाब आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.घटनेनंतर आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून, बाधित नागरिकांवर तातडीने उपचार सुरू आहेत.
शिवनाकवाडीत महाप्रसादातून विषबाधा – ३०० हून अधिक नागरिक रुग्णालयात
|