बातम्या
सीबीएस बस स्थानक परिसरात पोलिसाला मारहाण
By nisha patil - 1/29/2025 5:53:37 PM
Share This News:
विशाल दशरथ मुळे हे कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. काल मंगळवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ते मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे निघाले होते.
.%5B5%5D.jpg)
यावेळी महालक्ष्मी चेंबर परिसरात ट्रॅव्हल कंपन्यांकडे तिकीट एजंट म्हणून काम करणाऱ्या आकीब मुजावर याने विशाल मुळे यांना पुण्याला जायचे आहे का ? अशी विचारणा केली.दरम्यान विशाल यांनी मला पुण्याला जायचे नसून मी पोलीस आहे असे सांगितलं.मात्र तरीही संशयित आरोपी आकीब मुजावर याने त्यांना तिकीट काढण्यासाठी हाताला जबरदस्ती धरून नेलं. आकिब याचा भाऊ दिलदार मुजावर हा तिकीट पावती फाडू लागला. फिर्यादी मुळे यांनी याला विरोध केला.
यावेळी वादावादी झाली.दरम्यान जावेद पठाण याला दोघा संशयीत आरोपींनी बोलवले व तिघांनी मिळून विशाल यांना धक्काबुक्की व मारहाण करून धमकी दिली. अशी फिर्याद सहा.पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली आहे. यावरून तिघाही संशयित आरोपींना अटक करण्यात आलीय. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
सीबीएस बस स्थानक परिसरात पोलिसाला मारहाण
|