विशेष बातम्या
रंगपंचमीला पोलिसांची धडक कारवाई.
By nisha patil - 3/19/2025 4:46:48 PM
Share This News:
रंगपंचमीला पोलिसांची धडक कारवाई.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
कोल्हापूरमध्ये आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.शहरातील चौका चौकामध्ये तपासणी मोहीम सुरू होती.
दरम्यान दुचाकीवरून ट्रिपल शीट फिरणाऱ्या,हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आलिय.त्याचबरोबर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय.
रंगपंचमीला पोलिसांची धडक कारवाई.
|