विशेष बातम्या
दिशा सालियन प्रकरणात राजकीय सुनामी!
By nisha patil - 3/22/2025 8:19:45 PM
Share This News:
दिशा सालियन प्रकरणात राजकीय सुनामी!
वडिलांची याचिका, आदित्य ठाकरेंवर थेट आरोप
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून, याचिकेची सुनावणी २ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
याचिकेत सतीश सालियन यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, त्यांनी समीर वानखेडे यांना याचिकेची प्रत दिली असून, वानखेडे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी केली आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, पुढील सुनावणीत कोणते नवे खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिशा सालियन प्रकरणात राजकीय सुनामी!
|