विशेष बातम्या
शिवाजी विद्यापीठात पोर्तुगाल चित्रपट महोत्सव….
By nisha patil - 12/3/2025 6:09:22 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात पोर्तुगाल चित्रपट महोत्सव….
पोर्तुगीज स्त्रीची कहाणी सांगणारा माहितीपट.....
शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग आणि द कमॉइश इन्स्टिट्यूट, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. याच सांस्कृतिक आदानप्रदानाचा एक भाग म्हणून आज बुधवारी व उद्या गुरुवारी विद्यापीठात 'पोर्तुगीज चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. वनस्पतीशास्त्र विभागाच्या नीलांबरी हॉलमध्ये दोन्ही दिवस दुपारी २ ते ६ यावेळेत चित्रपट प्रदर्शन होईल. याचे उद्घाटन आज दुपारी दीड वाजता कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व डॉ. डेल्फिम कोरेड्या द सिल्वा यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तीशी विवाह करणारी पहिली पोर्तुगीज स्त्री एडिला गायतोंडे ही एक कार्यकर्ती, पियानो शिक्षिका होती. तिची कहाणी सांगणारा माहितीपट 'द ब्लू अॅपल्स" (२०२३) अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
शिवाजी विद्यापीठात पोर्तुगाल चित्रपट महोत्सव….
|