विशेष बातम्या
रेपो दरात कपात होण्याची शक्यता;
By nisha patil - 7/4/2025 4:22:18 PM
Share This News:
रेपो दरात कपात होण्याची शक्यता;
गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याचा दिलासादायक संकेत
घर घेणाऱ्या आणि कर्ज फेडणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांचे EMI कमी होण्याची शक्यता आहे.
आजपासून RBI च्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरू होत असून, या बैठकीत 0.25 टक्के रेपो दर कपात होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. जर हा निर्णय झाला, तर कर्जधारकांना मोठा दिलासा मिळेल.
फेब्रुवारी 2025 मध्ये RBI ने पाच वर्षांनंतर रेपो रेट 6.50% वरून 6.25% पर्यंत खाली आणला होता. त्या निर्णयामुळे बँकांनीही आपले कर्जावरील व्याजदर कमी केले होते. आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी RBI तसाच पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अस्थिरता वाढली आहे. अशा वेळी देशांतर्गत आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि नागरिकांची क्रयशक्ती मजबूत करण्यासाठी RBI हे महत्त्वाचे पाऊल उचलू शकते
रेपो दर हा RBI कडून इतर बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरचा अधिकृत व्याजदर असतो. जेव्हा RBI हा दर कमी करते, तेव्हा बँकांनाही कमी दराने पैसे मिळतात. परिणामी बँका कर्जांचे व्याजदर कमी करतात, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होतो.
या निर्णयाचे संभाव्य फायदे:
गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आदींच्या EMI मध्ये घट
रिअल इस्टेट क्षेत्राला चालना
घर खरेदीसाठी मागणी वाढण्याची शक्यता
देशांतर्गत आर्थिक व्यवहारांना गती
ह्या घडामोडींचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतो, त्यामुळे आगामी काळात कर्ज घेण्याची योजना आखणाऱ्यांनी RBI च्या निर्णयाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
रेपो दरात कपात होण्याची शक्यता;
|