बातम्या

कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता...

Possibility of earthquake in Kolhapur politics


By nisha patil - 5/8/2024 2:57:59 PM
Share This News:



 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील मोहरे हलवायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजीत घाटगे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. समरजीत घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मात्र, आता शरद पवारांनी  फडणवीसांचा हाच खास मोहरा फोडण्यासाठी प्रयत्न  सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
       

   समरजीत घाटगे यांना आपल्या बाजूला वळवण्याची जबाबदारी शरद पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार गटाच विशेष लक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून समरजीत घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघासाठी गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरु आहेत. 
       

कागलसाठी समरजीत घाटगे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे समरजीत घाटगे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली होती. यंदाही कागल मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाही समरजीत घाटगे यांच्यावर हात हलवत बसण्याची पाळी येईल. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.


कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता...