शैक्षणिक
प्रसाद जाधव: 'डे विथ कलेक्टर' उपक्रमाचा पहिला मानकरी
By nisha patil - 1/21/2025 1:56:10 PM
Share This News:
प्रसाद जाधव: 'डे विथ कलेक्टर' उपक्रमाचा पहिला मानकरी
दहावीतील विद्यार्थी प्रसाद जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या 'डे विथ कलेक्टर' उपक्रमात भाग घेतला. नवे पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूलचा विद्यार्थी प्रसाद हा उंचीने तीन फूट एक इंच असला तरी त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत प्रशासकीय कामकाजाचे निरीक्षण घेतले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या कार्याची माहिती देणे आणि त्यांना प्रेरणा देणे आहे.
प्रसादने विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला असून, वक्तृत्व स्पर्धांमध्येही बक्षिसे जिंकली आहेत. त्याचे उपकरण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले आहे. तसेच, त्याच्या उंचीच्या समस्येवर उपचारासाठी त्याला अमेरिका पाठवण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रसाद जाधव: 'डे विथ कलेक्टर' उपक्रमाचा पहिला मानकरी
|