बातम्या
प्रसाद जाधव यांचा निर्धार.. खंडपीठासाठी मॅरेथॉन दौड पूर्ण
By nisha patil - 1/24/2025 11:24:37 PM
Share This News:
कोल्हापूर सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्ट बेंच (खंडपीठ) मागणीसाठी चा लढा गेली 30-35 वर्ष अव्याहातपणे सुरू आहे .वकिलान सहित पक्षकार आणि नागरिकांची ही प्रमुख मागणी आहे. निवेदने, रास्ता रोको, काम बंद आंदोलन, उपोषण या सहित विविध टप्प्यांच्या वरती विविध स्वरूपाचे आंदोलने सुरूच आहेत.
यासाठीच सिटीझन फोरम अभिनव स्वरूपाची लक्षवेधी आंदोलने सुद्धा करत असून यातीलच एक भाग म्हणून सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव गेली दहा वर्षाहून अधिक काळ मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये फुल मॅरेथॉन कॅटेगरीत भाग घेऊन आपली मागणी हायकोर्ट मागणी प्रभावीपणे मांडत आहेत. यावर्षी सुद्धा आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी ते मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन आपला खंडपीठासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार करत दौंड पूर्ण केली. ते सातत्याने भाग घेत असल्यामुळे यावर्षी त्यांचा लिजंड क्लब मध्ये समावेश केला होता त्यांना 708090 असा विशेष क्रमांक (चॉइस नंबर) देण्यात आलेला होता तसेच we want Highcourt Bench in kolhapur या मागणीचे प्रिंट टि शर्ट परिधान करून मॅराथान मधे सर्वांचे लक्ष वेधले गेले यासाठी त्यांच्या सोबत बार असोसिएशन व सिटीजन फोरमचे मंदार राऊत, गौरव लांडगे, राहुल फल्ले, वैभवराज राजेभोंसले यांच्या सहित कार्यकर्ते व वकील यावेळी हजर होते
प्रसाद जाधव यांचा निर्धार.. खंडपीठासाठी मॅरेथॉन दौड पूर्ण
|