बातम्या

आमदार विनय कोरे यांच्याकडून प्रसाद वायकूळचा सत्कार...

Prasad Vaykul felicitated by MLA Vinay Kore


By nisha patil - 7/2/2025 7:40:06 PM
Share This News:



मांजरे (ता.शाहूवाडी) येथील कु.प्रसाद प्रकाश वायकूळ यांची दिल्ली येथे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या परेडसाठी १७ लाख विद्यार्थ्यांच्यामधून .प्रसाद प्रकाश वायकूळ यांची सेनापती म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी त्यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

तसेच कु.प्रसाद प्रकाश वायकूळ यांने मिळवलेल्या यशामुळे शाहूवाडी तालुक्याचे नाव जगभरात पोहोचले आहे.त्यांच्या या यशाचा मला या तालुक्याचा आमदार म्हणून अभिमान असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले...

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा (पेरिडकर),अमोल वरेकर,मांजरे गावचे सरपंच बाबुराव पाटील,गावच्या देवाचे मानकरी बाबू पाटील,मार्गदर्शक रामचंद्र पडवळ,दिनेश पडवळ,सुरेश बोरगे,प्रकाश वायकूळ,आनंदा पाटील,विष्णु पाटील,तरुण मंडळ अध्यक्ष परशुराम पाटील,पोलीस पाटील बाबू नारकर,आण्णा पाटील,बाबुराव जाधव,बापू बावकर,प्रकाश चोरगे,महादेव आढाव,सुरेश परब,अमोल वारे,सत्यवान वारे,राजेश आढाव,संभाजी कडव,सिताराम कांबळे,शामराव कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थितीत होत्या...


आमदार विनय कोरे यांच्याकडून प्रसाद वायकूळचा सत्कार...
Total Views: 46