शैक्षणिक

विवेकानंद कॉलेज मध्ये Prime Minister’s Internship Scheme बाबत मार्गदर्शन

Prime Ministers Internship Scheme


By Administrator - 2/17/2025 4:50:02 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेज मध्ये Prime Minister’s Internship Scheme बाबत मार्गदर्शन

कोल्हापूर, दि. 17: विवेकानंद महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) कोल्हापूरच्या ट्रेनिंग, प्लेसमेंट सेल व IQAC विभाग, Ministry of Corporate Affairs यांच्या वतीने Prime Minister’s Internship Scheme बाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये कु. अपर्णा मुद्दीयम, उपसंचालक, MCA मुंबई विभाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. त्यांनी Prime Minister’s Internship Scheme संदर्भात महत्वाची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना त्याच्या लाभांविषयी जागरूक केले.

कार्यक्रम आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

या प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी नियोजन करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण व सदस्य प्रा. संजय थोरात, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. राजश्री पाटील, प्रा. विजय पुजारी, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, प्रा व्ही. व्ही. मिसाळ, प्रा ए एल उपाध्ये, डॉ ए आर कासारकर आणि कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग यांनी विशेष परिश्रम घेतले.


विवेकानंद कॉलेज मध्ये Prime Minister’s Internship Scheme बाबत मार्गदर्शन
Total Views: 43