बातम्या
खंडपीठासाठी पुन्हा कोल्हापुरात आंदोलन...
By nisha patil - 4/7/2024 8:08:34 PM
Share This News:
आज कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरात पक्षकार संघटना (सिटीझन फोरम) आणि बार असोसिएशनचे नवीन पदाधिकारी व जुने पदाधिकारी ह्यांच्या मध्ये बैठक पार पडली यावेळी पक्षकार संघटनेने कित्येक वर्षे रस्त्यावरच्या आंदोलनासह तसेच ज्या-त्यावेळेच्या हायकोर्टाचे चीफ जस्टिस ह्यांची भेट घेऊन चर्चाही केली तसेच सरकारच्या माध्यमातूनही खंडपीठ मागणी लावून धरत आंदोलने केली व विविध टप्प्यावर प्रयत्न केले ह्या सर्वांचा आढावा घेवून पुनश्च एकदा आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला. तसेच कोल्हापूर येथे पूर्णवेळ विभागीय आयुक्त(महसूल सह सर्व) कार्यालय सुरू करण्यात यावीत ही मागणी लावून धरणे बाबत सखोल चर्चा झाली. यावेळी सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, नुतन अध्यक्ष सर्जेराव खोत, उपाध्यक्ष.सेक्रेटरी ह्यासह नवीन पदाधिकार्यांना शुभेच्छा ही दिल्या यावेळी संघटनेचे प्रसाद जाधव, राजेंद्र थोरवडे,वैभवराज राजेभोंसले, राजेंद्र चव्हाण,निलेश सुतार उदय लाड,निवास ब्रम्हपुरे,गौरव लांडगे उपस्थित होते
खंडपीठासाठी पुन्हा कोल्हापुरात आंदोलन...
|