बातम्या
कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधान भवनवर आक्रोश मोर्चा
By nisha patil - 6/25/2024 7:52:12 PM
Share This News:
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या या अद्याप प्रलंबित आहेत.युनियनच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.सरकारने आजपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, त्यासाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे असं संघटनेचं म्हणणं आहे.
यानंतरही आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करीत मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करून राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिला आहे.या मागणी नेमक्या कोणत्या आहेत तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे.
किमान वेतनाच्या अनुदानाची 19 महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी.ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धरतीवर करावी.
कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधान भवनवर आक्रोश मोर्चा
|