बातम्या

महावितरण विरोधात हमिदवाडा येथे सर्वपक्षीय,ग्रामस्थ यांच्याकडून निषेध आंदोलन...

Protest movement by all parties


By nisha patil - 1/25/2025 1:32:57 PM
Share This News:



हमीदवाडा गावात बसवलेले 21 प्रीपेड मीटर 15 दिवसात न काढल्यास सर्व मीटर गावतळ्यात टाकु, व जो कोणी अदानी पावर प्रतिनिधी मीटर बसवायला येईल वेगळ्या स्टाईलने प्रसाद देण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी गावकऱ्यांच्या वतीने दिला.

जोपर्यंत हे 21 प्रीपेड मीटर काढणार नाही तोपर्यंत महावितरणाने एक रुपये वीस बिल आम्ही गावकऱ्यांच्या वतीने भरणार नाही असा एकमताने निर्णय यावेळी सरपंच कृष्णात बुरटे यांनी घेतला. तसेच 26 जानेवारी च्या ग्रामसभेत प्रीपेड मीटर विरोधी ठराव पास करण्याचे ठरले.

अदानीचा महावितरणचा निषेध असो, अदानीच्या घशात महावितरण घालण्याचा डाव हा आम्ही मोडून काढून असा इशारा यावेळी जयसिंग टिकले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने देण्यात आला यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ,सरपंच कृष्णात बुरटे,उपसरपंच उमेश डावरे, शिवसेना उबाटा तालुका अध्यक्ष जयसिंग टिकले, युवासेना जिल्हाउपाध्यक्ष समीर देसाई,महेश जाधव,कमलेश रंगापुरे,अंकुश दूरडे,विनायक सुळकुडे,बापू कोले, कृष्णात हासोळे, सचिन पाटील, सागर वरूटे, साताप्पा पाटील, महेश कदम, शुभम हासोळे, विनायक कुंभार, उत्तम चौगुले, भाऊ बुरगुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


महावितरण विरोधात हमिदवाडा येथे सर्वपक्षीय,ग्रामस्थ यांच्याकडून निषेध आंदोलन...
Total Views: 64