बातम्या

इचलकरंजीकरांसाठी अभिमानास्पद...

Proud for Ichalkaranjikar


By nisha patil - 2/25/2025 4:59:38 PM
Share This News:



इचलकरंजीकरांसाठी अभिमानास्पद...

IGM रुग्णालयात नर्सिंग कॉलेजला मंजुरी..

 आमदार खासदारांच्या प्रयत्नाला यश

 इचलकरंजीतील आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (IGM) 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नर्सिंग कॉलेजला शासनाने मान्यता दिली आहे. आज 25 फेब्रुवारी रोजी या संदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला असून, हे कॉलेज सुरू करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
 

इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा फायदा ठरणार आहे. नवीन नर्सिंग कॉलेजमुळे तरुणांना वैद्यकीय शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल.

या नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळण्यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. इचलकरंजीतील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या त्यांच्या ध्येयाचा हा एक मोठा टप्पा आहे. त्यांनी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवली.


इचलकरंजीकरांसाठी अभिमानास्पद...
Total Views: 22