शैक्षणिक

गोखले कॉलेजमध्ये ‘स्वप्नवेल’ आणि ‘संजीवन’ कविता संग्रहाचे प्रकाशन

Publication of Swapnavel


By nisha patil - 8/2/2025 3:49:05 PM
Share This News:



कोल्हापूर :  गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा. मोहन पाटील लिखित ‘स्वप्नवेल’ आणि प्रा. एम.एम. कांबळे (राजू पुणेकर) लिखित ‘संजीवन’ या कविता संग्रहांचे प्रकाशन उत्साहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी दै. सकाळचे संपादक निखिल पंडितराव आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक श्रीराम मोहिते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे होत्या.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. पी.बी. झावरे यांनी करून दिला.

यावेळी निखिल पंडितराव यांनी ‘स्वप्नवेल’ या संग्रहात निसर्ग, पर्यावरण, प्रेमभावना आणि नात्यांची गुंफण प्रभावीपणे मांडल्याबद्दल कौतुक केले. ‘संजीवन’ कविता संग्रहामध्ये ग्रामीण व्यवस्था आणि विद्रोही विचार प्रकर्षाने दिसून येतात, असे त्यांनी नमूद केले.

प्रा. श्रीराम मोहिते यांनी या कविता संग्रहांतून जगण्याचे प्रश्न, प्रबोधन, नैसर्गिक जीवन आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा संदेश मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांनी या संग्रहांमधून पर्यावरण, नाती आणि निसर्ग यांची जाणीव निर्माण होईल, असे याप्रसंगी नमूद केले.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेटून कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास प्रा. पी.बी. झावरे, प्रा. एस.एन. मोरे, प्रा. आर.बी. सुतार, प्रा. श्रीम. एम.एल. धनवडे, प्रा. आर.जी. तावरे, प्रा. एस.एन. कुरणे, तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. श्रीम. ए.यु. पडवळ यांनी केले.


गोखले कॉलेजमध्ये ‘स्वप्नवेल’ आणि ‘संजीवन’ कविता संग्रहाचे प्रकाशन
Total Views: 51