शैक्षणिक
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
By nisha patil - 1/17/2025 2:48:22 PM
Share This News:
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
कोल्हापूर, दि. 17: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी त्यांचे स्वागत केले.
यानंतर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना पोलीस विभागाच्या सशस्त्र पथकाने मानवंदना दिली. यावेळी पोलीस बँडच्या धून वर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
|