बातम्या

राधानगरीत ए. वाय. पाटील यांचा दबदबा..

Radhanagarit A Y Patil s dominance


By nisha patil - 9/23/2024 6:58:41 PM
Share This News:



राधानगरी आजरा भुदरगड मतदार संघ हा इथल्या राजकारणामुळे बराच चर्चिला जात असून काल ए वाय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राधानगरी तालुक्यातील स्वप्नपरी हॉल येथे आयोजित या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली, कार्यकर्त्यांची उच्चांकी गर्दी पाहता ए. वाय. पाटील हेच भावी आमदार असणार याची पोचपावतीच त्यांनी दिली.

राधानगरी-आजरा भुदरगड मतदारसंघात ए. वाय. पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विकासाची आणि परिवर्तनाची घोषणा झाली. कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने, ए. वाय. पाटील यांचे नेतृत्व भविष्यात मतदारसंघाचा चेहरा बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यमान आणि माजी आमदारांविषयी नाराजीचा नाराजीचा रोष व्यक्त केला आणि विकासाचे स्वप्न साकारायचे असल्यास ए. वाय. पाटीलच हा एकमेव योग्य पर्याय असल्याचे ठाम मत मांडले.

मेळाव्यात बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी ए. वाय. पाटील यांच्या जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. सत्तेत नसतानाही त्यांनी सातत्याने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारे लोक अधिक दृढ झाले आहेत. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आणि अडचणी त्यांनी यशस्वीपणे सोडवल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमुखाने पाटील हेच आमदार व्हावेत अशी भूमिका घेतली.

कार्यकर्त्यांनी पाटील यांचे अनेक वर्षांचे समाजकार्य आणि प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सत्तेत नसतानाही त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले आणि सर्वसामान्य जनतेला आधार दिला. कार्यकर्त्यांनी एकमताने सांगितले की, भविष्यात पाटील यांना आमदार होण्याची संधी मिळाल्यास, ते नक्कीच या संधीचं सोनं करून मतदारसंघातील सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावतील.

या मेळाव्यात उपस्थितांनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधानगरीचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. जनतेच्या मनातील नेते म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांची आमदारकी निश्चित असल्याचे संकेत मिळाले.


राधानगरीत ए. वाय. पाटील यांचा दबदबा..