बातम्या
राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा ! - जिल्हाधिकारी यांना निवेदन
By nisha patil - 5/7/2024 7:18:47 PM
Share This News:
कोल्हापूर - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले.
या प्रसंगी ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेखा दुधाणे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, अखिल भारत हिंदू महासभेचे श्री. विकास जाधव, शिवसेना विभागप्रमुख श्री. लक्ष्मण लाड, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, विजय मोरे, जी.आर. काशीद, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. प्रीतम पवार उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त क्षमायाचना करावी. राहुल गांधी यांनी वा त्याच्या काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे असे नाही. तर यापूर्वी काँग्रेसने भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कोणी विस्थापित केले ? कोणत्या समाजाने हे विस्थापन केले हे राहुल गांधी सांगतील का ? ‘सर तन से जुदा’चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते, हे राहूल गांधी सांगतील का ? संपूर्ण विश्व जिहादी आतंकवादाने त्रस्त आहे, लाखो लोक मारले गेले आहे, पण या दहशतवादाचा रंग कोणता ? हे राहूल गांधी कधी सांगितलेले नाही. सर्वांत प्राचीन असलेला हिंदु धर्म हा सहिष्णु असल्यामुळे त्याने अन्य पंथीयांप्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्मपरिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही.
हिंदु धर्म हा वसुधैव कुटुंबकम किंवा संपूर्ण जग एक कुटुंब या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना सर्वांशी समभावाने वागण्याची जी शपथ घेतली जाते. त्या शपथेचा राहूल गांधी यांनी उडपपणे भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे आणि समाजात भेद, द्वेष निर्माण करणार्यांना अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा ! - जिल्हाधिकारी यांना निवेदन
|