बातम्या
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक!
By nisha patil - 7/29/2024 4:56:08 PM
Share This News:
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात काँग्रेसेचे नेते तथा विरोधी पक्षनेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काहीही नाही. दोन ते तीन टक्के लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल, तरुणांना मदत केली जाईल.
देशातील कामगार, छोट्या उद्योजकांची मदत केली जाईल. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एकाधिकारशाहीच्या सूत्राला आणखी मजबूत करण्यात आलं. एकाधिकारशाहीमुळे लोकशाही मूल्यांना नेस्तनाबूत केलं. उद्योगातील एकाधिकारशाहीमुळे देशातील लघु, शूक्ष्म उद्योगांना फटका बसला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक!
|