बातम्या
गावठी दारू तयार करणाऱ्या 10 हातभट्ट्यांवर छापा. सुमारे 2 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 6/7/2024 5:30:40 PM
Share This News:
कनेरीवाडी येथील कंजारभाट वसाहतीमध्ये बेकायदेशीर रित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला.यावेळी दोन लाख 17 हजार 780 रुपयांचा मुद्देमान जप्त केला.तर दहा जणांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
कनेरी वाडी येथील साईनगर कंजार भाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी बेकायदेशीर रित्या हातभट्टीची दारू तयार करा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस रिक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जाधव व त्यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला. यावेळी दहा ठिकाणी छापा टाकून 5400 लिटर कच्चे रसायन, पाचशे लिटर पक्के रसायन 230 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला. तर याप्रकरणी कंजारभाट वसाहतीतील रोहित दीपक घारुंगे, सनी सरवर बाटुंगे,अर्जुन रमेश घारूंगे,संदीप दीपक घारुंगे, जगदीश सुरेश बाटुंगे, राकेश सुरेश बाटुंगे, यांना अटक करण्यात आले तर यांचेसह चार महिलांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर,पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलिस अमलदार खंडेराव कोळी, संजय पडवळ,संजय हुबे, कृष्णात पिंगळे, हिंदुराव केसरे,प्रकाश पाटील,विनोद चौगुले, नवनाथ कदम, रोहित मर्दाने व सारिका मोटे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे कडील अवधूत कोरे ज्योती शिंदे यांनी मिळून केलीय.
गावठी दारू तयार करणाऱ्या 10 हातभट्ट्यांवर छापा. सुमारे 2 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त
|