बातम्या
भिवंडीत क्रिकेट सामन्यात पैशांचा वर्षाव
By nisha patil - 6/1/2025 10:20:59 PM
Share This News:
भिवंडीत क्रिकेट सामन्यात पैशांचा वर्षाव
चक्क टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडूवर पाचशेच्या नोटांचा वर्षाव केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिवंडी येथे संपन्न झालेल्या ग्रामीण धमाका बिग बँश स्पर्धेमधील हा व्हिडिओ आहे. स्पर्धेच्या फायनल सामन्या दरम्यान गोरसई ब स्पोर्ट्स संघाचा खेळाडू पवन केनेच्या बॅटिंगवर खुश होऊन भिवंडी परिसरातील विकास भोईर या प्रेक्षकाने त्याच्यावर ही पैशाची उधळण केलीय.सध्या सर्वत्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वायरल झालाय.
भिवंडीत क्रिकेट सामन्यात पैशांचा वर्षाव
|