बातम्या

राज ठाकरें मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Raj Thackeray meets Chief Minister


By nisha patil - 3/8/2024 2:37:43 PM
Share This News:



मनसे-अजित पवार गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पुण्यात आलेला पूर, शहरांचा नियोजन, वाढती बांधकामे, पाणी व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयांवर देखील राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. महायुतीत मनसेची भूमिका काय असणार? या विषयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.                                                                                                                      

 गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेतील नेते हे सुपारीबाज, दारू पिणारे, पळ काढणारे असे मिटकरी यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी त्यात राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे.


राज ठाकरें मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण