बातम्या

प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार... राज ठाकरे

Raj thakre


By nisha patil - 7/29/2024 4:57:34 PM
Share This News:



राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पुण्यात  पावसामुळे पाणीबाणी अशी पूरस्थिती निर्माण झाली होती. खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्यात आल्याने ही परस्थिती उद्भवल्याचे सांगत महापालिकेतील एका अधिकाऱ्याचे निलंबनही करण्यात आलंय.

मात्र, या परिस्थिती सर्वचजण जबाबदार आहेत. सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरेंनी  पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनाही टोला लगावला. 

          

पुण्यातील पूरस्थिती हाताळण्यावरुन राज ठाकरे यांनी महापालिका आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. पुण्यातील पूरस्थितीवरुन पुन्हा एकदा पुणे शहराचं विस्तारीकरण आणि नागरिकरणावर भाष्य केलंय. पुण्यात उद्भवलेल्या पूरस्थितीवर भाष्य करताना केवळ एका अधिकाऱ्याने निलंबन करुन हा प्रश्न सुटणार नसल्याचेही राज यांनी म्हटले.
       

राज्य सरकारलां, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं लागणार आहे. माजी नगरसेवकांनी नीट जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. कोणताही प्रकल्प आणताना सर्वांना विचारात का घेतल्या जात नाही. लोकांशी , पत्रकांरांशी का बोलत नाहीत. आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. कोण्या एकट्या पक्षाच हे काम नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले. तसेच, पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना अजित पवारांना टोलाही लगावला.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी नाव न घेता अजित पवारांना लगावला आहे.


प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार... राज ठाकरे