बातम्या
विवेकानंद मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विविध उपक्रमाने साजरी
By nisha patil - 6/27/2024 3:14:02 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित प्रा.डॉ.ए.जी.थोरात व विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांचे हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात व्याख्यान, वृक्षारोपन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कराड येथील प्रा.डॉ.ए.जी. थोरात यांचे राजर्षी शाहूंचे विचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, शाहू महाराज समाज क्रांतीचे प्रणेते होते. विचार हे सगळ्यात मोठे शस्त्र आणि संपत्ती असतात. शाहू विचार माणसाला सत्कर्म करायला भाग पाडतात. राजर्षि शाहू महाराजांच्या विचाराने आपण वाटचाल केली पाहिजे. समतेचे, न्यायाचे आणि लोककल्याणाचे राज्य स्थापन करण्याचे महत्तम कार्य राजर्षि शाहूंनी केले. बहुजन समाजात शिक्षणाचे नव नवे प्रयोग राजर्षि शाहू महाराजांनी केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा करवीर संस्थानामधला शाहूंचा आदेश भविष्यकाळात समाजात आमूलाग्र बदल घडविणारा ठरला.
निर्बलांचे रक्षण करण्याचे काम शाहूंनी केले. राजर्षि शाहूंचे विचार गुरुदेव कार्यकर्त्यांनी समाजात रुजविण्याचे काम करावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.समिक्षा फराकटे यांनी केले. तर आभार डॉ.अस्मिता तपासे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील IQAC समन्वयक डॉ.श्रृती जोशी, प्रबंधक श्री.आर.बी.जोग, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विविध उपक्रमाने साजरी
|