बातम्या

कोरगांवकर हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी राजर्षि शाहू जयंती संपन्न..

Rajarshi Shahu Jayanti celebrated with various activities in Korgaonkar High School


By nisha patil - 6/27/2024 2:44:58 PM
Share This News:



 आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूल मध्ये राजर्षि शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी राजर्षि शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला . सचिन कांबळे यांनी प्रभाकरपंत कोरगांवकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला . जुवेरिया शेख, प्रगती क्षीरसागर, स्नेहल चौगुले, वैभवी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले . प्रतिक सनदे आणि मारुती चव्हाण या विद्यार्थ्यांनी केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षक बाळासो कागले, राजाराम संकपाळ, प्रमिला साजणे यांच्या हस्ते करण्यात आले . साने गुरुजी बालक मंदिर आणि सावित्री श्रीधर विद्यालय यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता अंजली सोळवंडे या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन तर निरजा कुरणे हिने आभार प्रदर्शन केले . कार्यक्रमानंतर शिक्षकांच्या हस्ते मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी कोरगांवकर हायस्कूल, सावित्री श्रीधर विद्यालय आणि साने गुरुजी या शाळांचा सर्व शिक्षक वृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोरगांवकर हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी राजर्षि शाहू जयंती संपन्न..