खेळ
राजेश चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
By nisha patil - 3/15/2025 8:31:51 PM
Share This News:
राजेश चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
*कोल्हापूर उत्तर चे लाडके आमदार मान.राजेश क्षीरसागर यांचा नावे सुरू असणाऱ्या राजेश चषक लेदर बोल T 20 क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या सेमी फायनल सामन्या मध्ये सांगली पोलाईट संघाने सोलापूर संघाला नामवंत फायनल मध्ये प्रवेश केला ,या सामन्यात पहिला फलंदाजी करत सांगली संघाने 10 बाद 134 धावसंख्या केली यात प्रामुख्याने जीवक गोठणेकर याने 36 चेंडूत 34 धावा केल्या, सागर कोरे 32 चेंडू 31 धावा प्रथमेश भोसले 19 चेंडू 22 धावा,यात गोलंदाजी करताना सोलापूर संघा कडून सुदेश राठोड याने 4 गडी बाद केले तसेच,निखिल दोरणाल ने 2 गडी बाद केले, तसेच सोलापूर संघ 134 धावांचा पाठलाग करताना 112 धावांवर गुंडाळला ,यामध्ये निखिल दोरणाल ने 27 चेंडूत 34 धावा केल्या या सामन्यात सामनावीर म्हणून अष्टपैलू खेळाडू सागर कोरी या खेळाडूला ज्येष्ठ पंच शिवाजी कामते यांचा हस्ते देण्यात आला सांगली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला
दुसरा सेमी फायनल सामना
दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात अमर बागी पुरस्कृत स्व.अण्णा मोगणे संघा वर शिवनेरी क्रिकेट क्लब ने 31 धावांनी मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला
प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने 20 षटकात सर्वबाद 180 धावा केल्या त्या मध्ये वैभव पाटील 32 धावा, आथरव शिंदे 37 धावा,विवेक पाटील 23 ओमकार मोहिते 27 धावा तसेच अण्णा मोगने कडून गोलंदाजी करताना सागर मेतके,अमोल नीलुगडे,रचीत चौगले प्रत्येकी 2 बळी मिळवले
अमर बगी स्व.अण्णा मोगने संघाने 18 षटकात सर्व बाद 149 धावा केल्या यात प्रामुख्याने विषांत मोरे यांनी 64 धावा, अथरव शेळके 30 धावा ,रचीत चौगले 20 धावा चांगली फलंदाजी केली यात गोलंदाजी करताना शिवनेरी संघा कडून ओंकार मोहिते यांनी 4 बळी मिळवले, आथरव शिंदे 2 बळी अशी गोलंदाजी केली
या सामन्यात अष्टपैलू खेळी करणारा ओंकार मोहिते याला ,मुंबई क्रिकेट रणजी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विनीत इंदुलकर यांचा हस्ते सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला या स्पर्धेचा अंतिम सामना 16 तारखेला दुपारी ठीक एक वाजता सुरू होईल
शिवनेरी विरुद्ध सांगली पोलाइट. या दोन संघामध्ये होईल पारितोषिक वितरण मान.आमदार राजेश क्षीरसागर तसेच माजी आमदार जयश्री जाधव वहिनी यांचा हस्ते करण्यात येईल.
राजेश चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
|