बातम्या

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ

Rajesh Kshirsagar took oath of Membership


By nisha patil - 7/12/2024 11:31:23 PM
Share This News:



आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ
 
मुंबई दि.०७ : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वच आमदारांचा शपथविधी विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता. 

उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या नूतन आमदारांनी भगवे फेटे परिधान करून विधिमंडळात प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले. शपथविधी सुरु झाल्यानंतर नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी अनोख्या अंदाजात "आमदारकीची" शपथ घेतली यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वच आमदारांनी दाद दिली.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून, शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना अभिवादन करून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली घेतली. यास विधासभेत उपस्थित सदस्यांनी विषेश दाद दिली.  


आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ