बातम्या

राजू शेट्टींना पोलिसांनी घेतले ताब्यात...

Raju Shetty taken into custody by the police


By nisha patil - 3/15/2025 3:11:17 PM
Share This News:



राजू शेट्टींना पोलिसांनी घेतले ताब्यात...

कोल्हापूर न्यायालयात हजर...

शेतकऱ्यांच्या लढ्याला पोलिसी दडपशाही!

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कडेकोट बंदोबस्तात त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून, त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.


राजू शेट्टींना पोलिसांनी घेतले ताब्यात...
Total Views: 40